फियाट कारची आणखी चार दमदार मॉडेल्स येत्या वर्षांत येऊ घातल्याची माहिती फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवन्हल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्सच्या पूर्णपणे स्वत:च्या मालकीची सहयोगी असलेल्या फियाट ग्रूप ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने के२के पॅशन टूरमध्ये नागपूरचा समावेश केला आहे. नागपूरची डीलरशीप सव्र्हिस कॅम्प, एक्स्चेंज कॅम्प नियमितपणे आयोजित करेल. फियाटकडे २०१४ साठी उत्पादनांची आकर्षक श्रुंखला आहे. नवे कोरे लिनिया मॉडेल याआधीच बाजारात दाखल झाली आहे. नवीन पुन्टो, अॅव्हेनतुरा, कन्टेम्पररी युटिलिटी व्हेईकल जगाच्या पाठीवर प्रथान भारतात पदार्पण करेल. अबर्थ ५०० कारही येणार आहे. येत्या वर्षांतच ही चार दमदार मॉडेल्स बाजारात येतील. फियाटसाठी महाराष्ट्र ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. म्हणूनच के२के पॅशन टूरसाठी नागपूरमध्ये आलो असल्याचे नागेश बसवन्हल्ली यांनी सांगितले.
फियाट ऑल ईन वन कॅम्पसह शेजारच्या जिल्ह्य़ांना सेवा देण्यास आग्रही आहे. राईड आणि ड्राईव्ह टेस्ट, सव्र्हिस कॅम्प, एक्स्चेंज व नवीन उत्पादन प्रदर्शन यांचा त्यात समावेश आहे. टायर २ व टायर ३ शहरांमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी हब व ऑपरेशनच्या स्पोक मॉडेलसोबत कन्झ्युमर इंटरफेस वाढवत आहे. या मॉडेलनुसार वर्धा, अमरावती, चंद्रपूर येथे सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. माय फियाट वर्ल्ड, टीम फियाट इंडिया आणि एफएमसी यासारख्या फॅन ग्रूप्सच्या माध्यमातून फियाटचे देशात ६.२ लाख चाहते आहेत.
एका वर्षांत ११२ डीलरशीप सुरू करून फियाटने देशभरात भक्कम अस्तित्व बनवले आहे. या वर्षांच्या अखेपर्यंत दीडशे डीलर्स तयार केले जातील. विदर्भात आतापर्यंत तीन हजार कार विकल्या गेल्या आहेत.
जयका कार्सचे कुमार काळे व कार्तिक काळे तसेच महाव्यवस्थापक अमित डांगे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
फियाट कारची लवकरच चार नवी मॉडेल्स
फियाट कारची आणखी चार दमदार मॉडेल्स येत्या वर्षांत येऊ घातल्याची माहिती फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवन्हल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
First published on: 10-05-2014 at 09:22 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fiat new models