शहरात अवंतीनगरात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत पार्क चौक आणि वसंत विहार अशा दोन ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या. यात काठय़ा, चॉपर, फायटर, रेडियम कटर आदी शस्त्रांचा सर्रास वापर झाला असून यात सहाजण जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.
अवंतीनगरात काही दिवसांपूर्वी प्रसाद लोंढे या सामाजिक कार्यकर्त्यांचे श्रीमंतराजे प्रतिष्ठानचे कार्यालय फोडण्यात आले होते. या प्रकरणी शिवसेनेचे सहजिल्हा संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती. परंतु सुटकेनंतर बरडे समर्थक प्रमोद बाबर याचा प्रसाद लोंढे याच्याशी पुन्हा वाद उफाळून आला. त्यातून जवळच्या वसंत विहार भागात प्रमोद बाबर याच्यावर पंकज लोंढे, सद्दाम सय्यद, प्रवीण पवार, अमर पाटील व इतरांनी, तुम्ही प्रसाद लोंढे यांचे कार्यालय फोडण्यासाठी चिथावणी दिली काय, असा जाब विचारून रेडियम कटरने त्याच्या पोटावर तसेच त्याचा मित्र राहुल कालेकर याच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी करण्यात आले.
तर या घटनेचे पडसाद काही क्षणातच उमटून प्रसाद महादेव लोंढे व त्याचा मित्र रोहित जंगम या दोघांना पार्क चौकात बोलावून, तुम्ही आमच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद देण्यास सांगतो का, म्हणून दहा ते पंधरा जणांनी त्यांच्यावर चॉपर, फायटर व काठय़ांनी हल्ला केला. या वेळी प्रसाद लोंढे याच्या गळय़ातील सत्तर हजारांची सोनसाखळी हल्लेखोरांनी बळजबरीने तोडून नेल्याचे लोंढे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून सदर बझार पोलिसांनी श्रीपाद कालेकर, राहुल कालेकर, समर्थ बरडे, प्रमोद बाबर, अमोल कालेकर, सूरज काळे, अकिल सय्यद व अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापुरात तरुणांच्या दोन गटांत हाणामारी; सहा जखमी
शहरात अवंतीनगरात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत पार्क चौक आणि वसंत विहार अशा दोन ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या. यात काठय़ा, चॉपर, फायटर, रेडियम कटर आदी शस्त्रांचा सर्रास वापर झाला असून यात सहाजण जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting in 2 groups six injured in solapur