गणपतीच्या वर्गणीवरून दोन गटांत हाणामारी होऊन तीनजण जखमी झाले. औंढा नागनाथपासून जवळच परभणी रस्त्यावरील ढाब्यावर हा प्रकार घडला.
औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील काही युवक शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नॅशनल ढाब्यावर गणपतीची वर्गणी मागण्यास गेले होते. तेथे असलेल्या पानटपरीच्या मालकासोबत वर्गणीवरून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात ज्ञानेश्वर बोबडे, रावसाहेब बोबडे व सोपान बोबडे जखमी झाले. पानटपरीवरील साहित्याची मोडतोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक घोरबांड सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. या वेळी दोन्ही गटांतील लोकांनी पळ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting in two group on contribution 3 injured