राहाता शहरात दोन गटात हाणामारी होवून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. हाणामारीत गावठी कट्टा, रिव्हॉल्वर, तलवार, गज व काठय़ांचा वापर केल्याचे दोन्ही गटांनी म्हटले आहे. रविवारी मध्यरात्री सावता माळी मंदिर परिसरात ही घटना घडली.
पहिली फिर्याद राजेंद्र पठारे यांनी दिली. त्यावरुन राहाता पोलिसांनी राहुल मुकंदराव सदाफळ, सागर सदाफळ, गणेश साहेबराव सदाफळ, मंगेश चव्हाण व प्रकाश कदम यांच्या विरुध्द बेकायशीर जमाव जमवून रिव्हॉल्वरचा धाक दाखविला व लाथा बुक्क्यांनी तसेच गज, काठीने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. पठारे यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द आर्म अॅक्टसह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
राहुल मुकुंद सदाफळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र सखाराम पठारे व शशी जाधव या दोघांवर आर्म अॅक्टसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक एम. टी. बंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक गायकवाड व डमाळे हे तपास करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा