सराईत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर २० ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र येथील दिवाणी न्या. जे. ए. शेख यांच्याकडे दाखल केले. दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त असून, या प्रकरणाचा युवराज साळवे सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
सल्या चेप्यावर जिल्हा सत्र न्यायालयात ३० ऑगस्ट रोजी गोळीबार झाला. त्यात त्याच्यासह अन्य दोन नागरिक जखमी झाले होते. सल्यावर मुंबईत जसलोक रुग्णालयात उपचार झाले. त्याच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पथकाने केला. त्यात युवराज सर्जेराव साळवे व जयवंत सर्जेराव साळवे (दोघे, रा. कोपर्डे हवेली), सूरज ऊर्फ बाळू सर्जेराव पाटील (जोतिबा मंदिरामागे, मंगळवार पेठ), किरण गुलाब गावित (सैदापूर), अमोल संपत मदने व संकेत नारायण पवार (बनवडी), मंदार कृष्णराव मदने (करवडी), अनिल चौगुले, अभिनंदन झेंडे व भानुदास धोत्रे (कराड) अशी आरोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. सल्या मारेल या भीतीनेच त्याला मारण्याचा कट रचल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. पोलिसांकडून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा