कल्याण डोंबिवली महापालिकेतील अपक्ष नगरसेवक बाळा हरदास यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती आर. डी. धानुका यांच्या खंडपीठाने २४ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे.
वैश्य वाणी ही जात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गात मोडत नाही. याच जातीच्या आणि प्रभागातून निवडणूक लढवलेल्या दोन नगरसेवकांची पदे याआधीही न्यायालयाने रद्द केली होती. यामुळे हरदास यांचेही नगरसेवक पद रद्द करून त्यांच्याकडून दोन वर्षांत पालिकेकडून देण्यात आलेल मानधन जप्त करावे, अशी मागणी निवडणुकीतील हरदास यांचे प्रतिस्पर्धी सुलेख डोन व अन्य मंडळींनी केली आहे.
सोमवारच्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी पक्षातर्फे न्यायालयात कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे न्यायालयाने २४ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी असल्याचे सूचित केले आहे. यापूर्वी विश्वनाथ महाडेश्वर व राजेंद्र देवळेकर यांची पदे न्यायालयाने रद्द केली होती. देवळेकर हे आता कल्याण डोंबिवली पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून दाखल झाले आहेत. तसेच लाडशाखीय वाणी जात कोणत्या प्रवर्गामध्ये मोडते अशी माहिती एका दक्ष नागरिकाने पालिकेत मागविली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा