पाच लाखांमध्ये आमदारकीची उमेदवारी विकण्यास मनसेलाही काही भीक लागली नाही. उलट उपसभापती नेमताना त्याच्याकडून करार कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यातले काही रुपये उपसभापतींनी आमदारांना दिले देखील, असा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी केला.
शहरातील जयस्वाल सभागृहात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात नांदगावकर बोलत होते. या वेळी त्यांनी जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. नांदगावकर म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्य़ातील मनसेच्या कार्यकर्त्यांत ताकद आहे. पण ती गटा-गटांत व मतभेदात विभागली गेली आहे. जेव्हा जेव्हा औरंगाबादचा दौरा करतो, तेव्हा पदाधिकाऱ्यांचे कान टोचतो. आता कान उपटावे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कन्नड मतदारसंघाचे आमदार पक्ष सोडून गेले, पण त्याचा काहीएक परिणाम होणार नाही. तसेच त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा