अनेक महिन्यांपासून कोमात असलेल्या रुग्णावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराचा खर्च सदर कुटुंबाला पेलवत नसल्याने त्यांच्यावतीने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळवाडे येथील अलका सुरेश महाले यांच्यावर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाले यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरु असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. त्यांचे पती सुरेश महाले यांची आर्थिकस्थिती हलाखीची असल्याने रुग्णालयातील पुढील औषधोपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असून समाजातील दानशुर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन महाले कुटुंबियांकडून करण्यात आले आहे. मदतीसाठी ९९२१०९५६३९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
आणखी वाचा