पर्यावरणाच्या मोठय़ा प्रमाणातील ऱ्हासामुळे दरवर्षी सहा दशलक्ष हेक्टर वनसंपत्ती नष्ट होत आहे. निसर्गाची, जलसंपदेची, जीवसृष्टीची किंमतच माणसांना कळत नाही. अमेरिकेमध्ये मधमाशीच्या किमतीचाही अभ्यास केला जातो. भारतामध्ये जीवसृष्टीची किंमत केली जात नाही. त्यामुळे त्याचे महत्त्व कळत नसल्याची खंत पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली.
कराड नगरपालिका व एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्ल्बतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील बक्षीस वितरण डॉ. शेंडे यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा उमा हिंगमिरे अध्यक्षस्थानी होत्या. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, टेंभू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, वनअधिकारी जाधव, नगरसेवक विनायक पावसकर, एन्व्हायरो नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, उपाध्यक्ष प्रकाश खोचीकर यांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ. शेंडे म्हणाले, की माणसाचे निसर्गावर अतिक्रमण होत असल्याने ६० टक्के निसर्ग कायमचा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कराडमधील नागरिक व गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. ही खऱ्या अर्थाने क्रांती आहे.
मितेश घट्टे म्हणाले, की यंदा कराडच्या मंडळांनी कमी प्रमाणात गुलालाचा वापर केल्याने पर्यावरणाची हानी टळण्याबरोबरच त्यातून पर्यावरण रक्षण होण्यासही हातभार लागला आहे. ए. आर. पवार यांनी आभार मानले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विजेत्यांची नावे अशी – घरगुती सजावट स्पर्धा- माधुरी रानभरे(प्रथम), रूपाली जाधव (द्वितीय), श्रीमती विमल ओझा (तृतीय), डॉ. चंद्रकला शिंदे, सुवर्णा पवार (उत्तेजनार्थ). अमृता खोचीकर (विशेष पुरस्कार). मूर्तिकार- मारूती कुंभार, मारूती यशवंत कुंभार, दीपक खटावकर, मोहन कुंभार, राहुल कुंभार. मूर्तिदान केलेले नागरिक – सौ. क्षिप्रा कुलकर्णी, विदुला कुलकर्णी, बजरंग कुसूरकर, डॉ. शशांक हर्डीकर, अनिकेत शिंदे, प्रवीण गायकवाड, अर्चना कांबळे. शाळा व महाविद्यालये – टिळक हायस्कूल, विठामाता हायस्कूल, शिवाजी विद्यालय, सरस्वती विद्यामंदिर, कन्याप्रशाला, पालिका शाळा क्रमांक तीन व एसजीएम कॉलेज. सामाजिक संस्था – इनरव्हील क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब. शासकीय संस्था-पंचायत समिती कराड. गणेश मंडळे-मयूर गणेश मंडळ (सोमवार पेठ), न्यू हनुमान मंडळ (बाबरमाची), नंदकुमार मंडळ (शनिवारपेठ), श्री गणेश मंडळ (कासार गल्ली) क्रांती ऑटो रिक्षा मंडळ (बसस्थानक परिसर) व जयजवान मंडळ (शुक्रवारपेठ) आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
भारतात जीवसृष्टीचे मूल्य नष्ट – डॉ. राजेंद्र शेंडे
पर्यावरणाच्या मोठय़ा प्रमाणातील ऱ्हासामुळे दरवर्षी सहा दशलक्ष हेक्टर वनसंपत्ती नष्ट होत आहे. निसर्गाची, जलसंपदेची, जीवसृष्टीची किंमतच माणसांना कळत नाही. अमेरिकेमध्ये मधमाशीच्या किमतीचाही अभ्यास केला जातो.

First published on: 08-10-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finish to indian life value dr rajendra shende