शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला गुरुवारी भीषण आग लागली. स्कोडा कंपनीच्या बाजूला पॅनकिन इंटरनॅशनल लि. या मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत ३ कोटी रुपयांचे सामान व यंत्रसामुग्री जळून भस्मसात झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. रात्री ८ पर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली, हे समजू शकले नाही.
पॅनकिन इंटरनॅशनल या कंपनीचे गोदामही जवळच आहे. आग लागल्याचे समजताच एमआयडीसी अग्निशमन व महापालिकेच्या दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग एवढी भीषण होती की, दोन-तीन किलोमीटरपासून आगीचे लोट दिसत होते. धूर आणि ज्वालांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. २५ कर्मचारी, २ फायर टेंडर व १ हजार लिटर फोम वापरूनही उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. मेणबत्तीचा कारखाना असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला आग; ३ कोटींचे नुकसान
शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला गुरुवारी भीषण आग लागली. स्कोडा कंपनीच्या बाजूला पॅनकिन इंटरनॅशनल लि. या मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत ३ कोटी रुपयांचे सामान व यंत्रसामुग्री जळून भस्मसात झाली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-12-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire candle workshop