शेंद्रा एमआयडीसीतील मेणबत्तीच्या कारखान्याला गुरुवारी भीषण आग लागली. स्कोडा कंपनीच्या बाजूला पॅनकिन इंटरनॅशनल लि. या मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत ३ कोटी रुपयांचे सामान व यंत्रसामुग्री जळून भस्मसात झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. रात्री ८ पर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली, हे समजू शकले नाही.
पॅनकिन इंटरनॅशनल या कंपनीचे गोदामही जवळच आहे. आग लागल्याचे समजताच एमआयडीसी अग्निशमन व महापालिकेच्या दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग एवढी भीषण होती की, दोन-तीन किलोमीटरपासून आगीचे लोट दिसत होते. धूर आणि ज्वालांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. २५ कर्मचारी, २ फायर टेंडर व १ हजार लिटर फोम वापरूनही उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. मेणबत्तीचा कारखाना असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire candle workshop