दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बेकायदेशीरपणे कोणीही फटाक्यांचे दुकान सुरू करू नये. असे कोणी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिला आहे.
फटाके सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच उडवावेत. बंदी घातलेल्या फटाक्यांचा वापर करण्यात येऊ नये, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांसारख्या शांततामय क्षेत्रात तसेच पेट्रोलपंप, केरोसीन व ज्वालाग्राही पदार्थाचा साठा व विक्री करण्याच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसरात फटाक्यांचा वापर करण्यात येऊ नये, फटाके उडविताना पाकिटावर नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे, लहान मुले फटाके उडवीत असतील तर त्यांच्याबरोबर पालकांनी उपस्थित राहावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
मान्यताप्राप्त कंपनीचेच फटाके उडवावेत, फटाके विक्री दुकानाजवळ धूम्रपान करू नये, २० फुटांपेक्षा जास्त लांबीची फटाक्याची माळ असता कामा नये. जर साखळी फटाक्यात एकूण ५०, ५० ते १०० आणि त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटपर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसिबल एवढी असावी. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही सरंगल यांनी दिला आहे.

Story img Loader