कुरखेडा पोलीस उपविभागाअंतर्गत बेळगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांची विशेष मोहीम गेल्या दोन दिवसांपासून नक्षलवादविरोधी मोहीम राबवत असताना लेकुरबोडी जंगल परिसरात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास बंदुकधारी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर १५ मिनिटे अंदाधूंद गोळीबार सुरू केला.  पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र समितीचा सचिव मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ दीपक, विभागीय समितीचा सदस्य पहाडसिंग ऊर्फ मरकाम, कुरखेडा-कोरची दलमचा कमांडर दरबारसिंह मडावी उपस्थित होते. यात काही महिला नक्षलवादीही सहभागी होत्या, अशीही माहिती त्यांनी दिली. यानंतर लेकुरबोडीपासून ५ ते ६ कि.मी. अंतरावरील जंगलात पोलिसांची पथक शोधमोहीम राबवत असताना नवेझरीच्या जंगलात मंगळवारी दुपारी नक्षलवाद्यांनी दडवलेल्या एका स्टीलच्या दोन डब्यात मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे आढळून आली. त्यात बंदुकीची लहान मोठी काडतुसे, दुसऱ्या डब्यात ४ फ्लॅश लाईट, २ वॉकीटॉकी, १ स्वीच व माओवादी साहित्य मिळाले.

Story img Loader