महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनतर्फे पहिले ‘शब्द’ विश्व साहित्य संमेलन पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बँकॉक येथे आयोजित करण्यात आले आहे. अलिबाग येथे संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलनात हा निर्णय घेण्यात आला.
बँकॉक  विश्व शब्द साहित्य संमेलनात राज्यातील सुमारे तीनशे साहित्यिक सहभागी होणार असून जून महिन्याच्या अखेपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलत मिळणार आहे.  या संमेलनाच्या निमित्ताने नवोदित साहित्यिकांनाही यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संघटनेचे अध्यक्ष संजय सिंगलवार (९४०३६२८०३२) किंवा सचिव प्रभाकर वानखेडे (९८६०२५१३६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा