फिटनेसकडे वाढता कल
वाढत्या शहरीकरणासोबत मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. व्यायामाची साधनेही बदलली आहेत. पूर्वीच्या मल्लखांब, आखाडे आणि व्यायामशाळांच्या ठिकाणी आता जिम सुरू झाले आहेत. तरुणाईची पावले जिमकडे वळू लागली असून नागपुरातही जिम संस्कृती चांगलीच वाढत चालली आहे.
वाढत्या नागरीकरणाने सर्वाची धावपळ आणि ताणतणाव वाढत चालले असले तरी आरोग्याकडे लक्ष देणेही तेवढचे गरजेचे झाले आहे. आजची तरुण पिढी ‘फिटनेस’कडे लक्ष देऊ लागली आहे. निरोगी आरोग्यासाठी तरुणाई जिमकडे वळली आहे. शरीरातून घाम काढून अंग पिळदार करण्याचे जिम हे आधुनिक व्यायामाचे ठिकाण बनले आहे. जिम आणि हेल्थ क्लब या नावाने ओळखली जाणाऱ्या या ठिकाणांची शहरातील संख्या आता बरीच वाढत आहे. प्रत्येक नगरात छोटय़ा छोटय़ा तीन-चार जिम्स सुरू आहेत. नागपुरात तळवलकर्स प्राईम फिटनेस, वर्कआऊटस् या सारख्या मोठय़ा जिमसह तीनशेवर छोटय़ा जिमम्स आहेत. फिटनेसकडे पाहण्याचा कल वाढत असल्याने जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या क्षेत्राची आवड असलेल्यांना तरुणांना जिममध्ये शिकविण्यासाठी लागणाऱ्या ट्रेनर, जीम इन्स्ट्रक्टर होण्याची चांगली संधी आहे. काही तरुण या क्षेत्राकडे करिअर करण्याच्यादृष्टीनेही वळत आहेत. स्टार हॉटेल्स, क्रुझ, स्थानिक जिम्ससोबतच परदेशातसुद्धा काम करण्याची संधी आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवणे व मदत करण्यासाठी ‘पर्सनल ट्रेनर’ची गरज पडते. जिममध्ये आलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक तपशीलावरून व्यायाम ठरविण्याचे काम ‘प्रोग्रामर’ करीत असतो. जिममध्ये सोयी सुविधा पुरविणे, व्यवस्थापनासाठी मदत करणे, वयोमान आणि कामाच्या स्वरूपानुसार गट पाडून त्यांनी व्यायाम कसा करावा याबाबतचे मार्गदर्शन व्यवस्थापक करीत असतो. निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान १५ मिनिटे तरी व्यायाम करायला हवा. ज्यांना जिमला जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी चालणे आणि सूर्यनमस्कार करणे हे व्यायामाचे सोपे मार्ग आहेत.
जिममध्ये व्यायामासाठी विविध आधुनिक उपकरणांचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओ मशीन, पॉवर लिप्टिंग, अॅब्डॉमिनल मशीन, लिव्हरेज, इंक्लाईन प्रेस, बारजॉगर, बुलवर्कर, डम्बेल, स्टनिंग सायकल आदी साधनांचा समावेश आहे. वेटलॉस, वेटगेन, बॉडीबिल्डिंग, जनरल फिटनेस, स्टीम बाथ अशी व्यायामाची वर्गवारी आहे. मुले, महिला व पुरुष सर्वच जिमला येत आहेत.
१४ वर्षांच्या मुलांपासून ते ९० वर्षांच्या वृद्धापर्यंतचे जिममध्ये चांगला व्यायाम करतात. जिममधून व्यायाम करणाऱ्यांना आहाराचीही माहिती दिली जाते. मार्गदर्शनासाठी फिजिओथेरपिस्टही असतो, असे तळवलकर्स प्राईम फिटनेसच्या नागपूर शाखेच्या प्रमुख विनिता भाटिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तरुणाईची पावले ‘जिम’कडे..
फिटनेसकडे वाढता कल वाढत्या शहरीकरणासोबत मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. व्यायामाची साधनेही बदलली आहेत. पूर्वीच्या मल्लखांब, आखाडे आणि व्यायामशाळांच्या ठिकाणी आता जिम सुरू झाले आहेत. तरुणाईची पावले जिमकडे वळू लागली असून नागपुरातही जिम संस्कृती चांगलीच वाढत चालली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2012 at 05:00 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness exercise surya namaskar