सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
धूम स्टाइलने येऊन ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करण्याच्या तब्बल पाच घटना रविवारी कल्याण, डोंबिवलीत परिसरात घडल्या आहेत. यात सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी काही तासांत लुटून नेला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी अशा प्रकारची लूटमार करणाऱ्या भिवंडीतील वडील-मुलाच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली होती.
मानपाडा, रामनगर, महात्मा फुले, टिळकनगर, बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली आहे.
 दुचाकीवरून धूम स्टाइलने येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लांबवायचा आणि तिला काही कळायच्या आत पळून जायचे अशी या चोरीची पद्धत आहे.
 विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार केले तर पळायला जागा नाही. कोपर पुलाजवळ आपण अडविले जाऊ अशी भीती चोरटय़ांच्या मनात असल्याने या भागात ते हे प्रकार करण्यास धजावत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader