दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-निजामुद्दीन गाडी १३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता पुणे स्थानकाहून सुटणार आहे. पुणे-पटना एक्स्प्रेस १६ नोव्हेंबरला रात्री पावणेअकरा वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. या गाडीची द्वितीय श्रेणी अनारक्षित आहे. पुणे- नागपूर ही गाडी १७ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर ही गाडी १८ नोव्हेंबरला दुपारी सव्वाचार वाजता पुणे स्थानकाहून सुटेल. पुणे-नागपूर ही दुसरी गाडी २० नोव्हेंबरला दुपारी सव्वादोन वाजता सुटेल.
पुणे-पटना या गाडीचे सर्व डबे द्वितीय श्रेणीतील अनारक्षित असणार आहेत. त्यामुळे या गाडीसाठी योग्य वेळेत तिकिटे काढावीत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.    

Story img Loader