* डॉ. किरीट सोमय्यांचा आरोप  
* ‘एसआयटी’मार्फत चौकशीची मागणी
राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे ‘भ्रष्टाचाराचे सार्वजनिक बांधकाम’ असा उल्लेख करून या विभागात जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्यातील सार्वजनिक बांधकाम घोटाळ्याची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
सिंचन घोटाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा हा महाराष्ट्राला लागलेला मोठा कलंक असून मंत्री, अधिकारी आणि कंत्राटदारांनी एकत्रितपणे केलेले भ्रष्ट बांधकाम म्हणजे हा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. नाशिकच्या चिखलीकर घोटाळ्यानंतरही सरकारचे डोळे उघडत नाही, याबद्दल सोमय्या यांनी खेद व्यक्त केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी नाशिक येथे अधिकाऱ्यांची केलेली पाठराखण ही अत्यंत दुर्दैवी असून भुजबळ हे भ्रष्टाराचाची खिल्ली उडवित आहेत, असा आरोप त्यांनी केला. अभियंते व कंत्राटदारांना पाठिंबा देणाऱ्या भुजबळांच्या वक्तव्याला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहमत आहेत का?  स्वीय सहायक संजय बेडसेवर कारवाई झाली तर घोटाळे उघडकीस येण्याची भीती भुजबळांना  वाटते का?  मंत्री, अभियंते आणि कंत्राटदार यांचे संगनमत असून ते पत्नी व मुलांच्या कंपन्यांना गैरमार्गाने कंत्राट देतात, याला भुजबळ, पवार व चव्हाणांचा पाठिंबा आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अभियंत्यांनी त्यांच्या पत्नी व मुलांच्या कंपन्यांना बांधकामांची कंत्राटे दिली अशा १९ अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सोमय्या यांनी राज्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केली असून बांधकाम घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, प्रवक्ते गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे व चंदन गोस्वामी उपस्थित होते.

सीबीआयने पिंजऱ्यातून बाहेर पडावे
रेल्वे घोटाळ्यात सीबीआयने पवनकुमार बंसल यांना क्लीन चीट दिल्याबद्दल भाजपला धक्का बसला आहे. खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सीबीआयच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करून सीबीआयने पिंजऱ्यातून बाहेर पडावे, असे म्हटले आहे. रेल्वे मंडळावर महेशकुमार यांच्या नियुक्तीची प्रक्रिया दहा दिवसात पूर्ण झाली. महेशकुमार यांना कोणत्या आधारावर कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले, याबाबतही त्यांनी विचारणा केली आहे. सीबीआयने पिंजऱ्यातील पोपट म्हणून न राहता स्वतंत्रपणे काम करावे, असे सोमय्या म्हणाले. 

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार