पदवीधर सामाजिक संघटनेतर्फे विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्यासाठी ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘फोकस करीअर आणि जॉब फेअर’ चे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या अनुभवी, अननुभवी पदवीधरांनाही या मेळाव्यात सहभागी होता येणार असून शिवाजी पार्क येथील स्काऊट हॉलमध्ये सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत होणाऱ्या या मेळाव्यात ज्येष्ठ तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या विषयाची निवड करावी, असा प्रश्न नेहमी पालकांना पडत असतो. त्यांच्या मूल्यमापनासाठी मोफत अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. अनुभवी, अननुभवी पदवीधरांना या मेळाव्यामध्ये रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंजिनिअरींग, टेक्नॉलॉजी, ह्यूमन रिसोर्स, आयटी, इकॉनॉमी अ‍ॅण्ड फायनान्स, इंटरनॅशनल मॅनेजमेन्ट, डिस्टन्स लर्निंग, अ‍ॅनिमेशन, आर्किटेक्चर, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, म्युझिक, टेक्निकल, व्होकेशनल, एव्हिएशन, मीडिया, हॉटेल मॅनेजमेन्ट, बिझनेस मॅनेजमेन्ट, फॉरेन भाषा, मार्केटिंग आणि आणखी बऱ्याच विभागांबद्दल आणि त्यातील संधीबाबत येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिशा आणि बेरोजगारांना योग्य ती नोकरीची संधी मिळणार आहे, पदवीधर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, उपाध्यक्ष शैलेश खांडेकर, संतोष धोत्रे, अभिजीत भोसले यांनी या उपक्रमाचा आराखडा तयार केला असून लोकसत्ता माध्यम आयटीएम ग्रुप यांनी त्यांना विशेष सहकार्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा