नववर्षांच्या स्वागताचा आनंद साजरा करण्यासाठी मद्यप्रेमींना पहाटे पाचपर्यंत मद्यप्राशन करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय राज्यातील सर्व मद्यविक्री परवाने असलेली हॉटेल, बिअर बार, पब यांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरात नाताळ आणि नववर्षांच्या स्वागताचा आनंद रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन करून साजरा केला जातो; परंतु रात्री १० ते ११ पर्यंत कायद्याने बंदी असली तरी काहीवेळा छुप्या पद्धतीने त्याचे उल्लंघन केल्या जाते. पर्यायाने कायदा पाळण्याऐवजी तो मोडण्याकडे लोकांचा कल असतो. हे सारे विचारात घेऊन वेळेची मर्यादा शिथिल करण्याची विनंती राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने एका पत्राद्वारे गृहविभागाला केली होती. त्यानुसार गृहविभागाने मान्य करून तसा आदेश नुकताच जारी केला आहे. त्या आदेशानुसार परदेशी मद्य किरकोळ विक्राीच्या दुकानांना १ जानेवारीच्या १ वाजेपर्यंत मद्यविक्रीची अनुमती असेल तर परमिट रूम, बिअर बार यांना पहाटे पाचवाजेपर्यंत मद्यविक्री आणि मद्यसेवा सुरू ठेवता येईल.
३१ डिसेंबरला मध्यरात्रीनंतर अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे उपवासाचा मेन्यू ठेवण्यात आला आहे. नागपुरातील हॉटेल्स, पब्ज, रेस्टारंटमध्ये नववर्षांच्या पाटर्य़ाचे बुकिंग झाले आहे. डीजे, वाद्यवृंदांची कंत्राटे देऊन झाली आहेत. नववर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने होणारी धूमधाम लक्षात घेऊन गर्दीचे खास ‘स्पॉट’ पोलिसांनी हेरून ठेवली आहेत. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर उफाळलेल्या जनक्षोभ पाहून मुलींची छेडछाड रोखण्यासाठी खास पथके तैनात केली जाणार आहेत. नागपुरात अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. दारूच्या नशेत बेभान वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नववर्षांचा आनंद संयमाने आणि कोणतीही अनुचित घटना होऊ न देता साजरा करण्याचे आवाहन अनेक संघटनांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा