ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथविक्रीच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘मॅजेस्टिक’ने आता मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी   majesticonthenet.com ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत वाचकांना ‘मॅजेस्टिक’सह अन्य प्रकाशकांचीही पुस्तके घरबसल्या करता येणार आहेत.
मॅजेस्टिक बुक स्टॉल, मॅजेस्टिक बुक डेपो, मॅजेस्टिक ग्रंथदालन आणि मॅजोस्टिक पब्लिशिंग हाऊसच्या परिवारात आता ‘मॅजेस्टिक ऑन द नेट’ची भर पडली आहे. तरुण पिढीचे मराठी वाचन संस्कृतीशी नाते जोडण्यासाठी ‘मॅजेस्टिक’च्या अशोक कोठावळे यांनी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेत ३०० रुपयांवरील ऑनलाइन कार्डवर खरेदी केलेली बृहन्महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांची मराठी आणि इंग्रजी पुस्तके पुस्तके ‘मॅजेस्टिक’च्या खर्चाने पाठविण्यात येणार आहेत. तसेच ५०० रुपये आणि त्यावरील किंमतीची पुस्तके मागविल्यास ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ अंतर्गत ही पुस्तके वाचकांना घरपोच मिळणार आहे. सध्या ही सुविधा मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी आणि पुणे येथे उपलब्ध आहेत. वाचकांच्या प्रतिसादानंतर आणखी काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
पुस्तकांबरोबरच कथाकथन, नाटके, बालगीते, शास्त्रीय संगीत, भक्तिगीते, मराठी चित्रपट आदींच्या सीडीही उपलब्ध आहेत. या संदर्भातील अधिक माहिती
http://www.majesticonthenet.com या संकेतस्तळावर किंवा +९१९१६७५६६२१३ या टोल फ्री क्रमांकावरही मिळू शकेल.