वनविभागाच्या वतीने तालुक्यातील सुगाव आणि पांगरी येथील रोपवाटिकांमध्ये वन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.
अकोले शहरापासून सुमारे तीन किमी अंतरावर सुगाव येथे प्रवरा नदीच्या काठी वनखात्याची रोपवाटिका आहे. सात हेक्टर क्षेत्र असणाऱ्या या रोपवाटिकेतील अडीच ते तीन हेक्टर क्षेत्रात हे वन उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी दिली. या वनोद्यानात लहान मुलांसाठी बालोद्यान, जॉिगग ट्रॅक, उद्यानातून िहडण्यासाठी पाऊलवाटा, लहान मुलांसाठी खेळणी, कारंजे, झुलता फुल, झाडांभोवती ओटे, निरीक्षण मनोरा, नदीकाठी मचाण, पॅगोडा आदी सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार आहेत. स्थानिक स्वरूपाची विविध झाडेही लावण्यात येणार असून लोकांना झाडांची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वृक्षाची माहिती दर्शविणारे फलक लावले जाणार आहेत. २५ हजार लोकसंख्येच्या अकोले शहरात लोकांसाठी एकही उद्यान अथवा चांगले मैदान नाही. शहरापासून जवळच सुगाव येथे हे उद्यान होत असल्यामुळे शहरवासीयांच्या दृष्टीने प्रवरा नदीकाठचे हे उद्यान आकर्षणाचा केंद्रिबदू ठरेल. मुळा खोऱ्यातील पांगरी येथेही वनखात्याची मोठी रोपवाटिका आहे. त्याठिकाणीही असेच उद्यान विकसित केले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा