मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेले सीव्हीएम कुपन हद्दपार करून एटीव्हीएम प्रणालीला प्रोत्साहन देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने तयारीही चालवली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर ७५ टक्के एटीव्हीएम मशिन्स उत्तम स्थितीत कार्यरत असून प्रवाशांनीही या यंत्रांना पसंती दल्यिाचे दिसत आहे. मध्य रेल्वेने प्रत्येक स्थानकावर ‘फॅलिसिटेटर’ नेमून प्रवाशांना रांगेविना तिकीटांचा आनंद देण्याचाही प्रयत्न केला आहे. पुढील काळात एटीव्हीएम मशिन्सची स्थिती अजून सुधारणा असून आणखी नवनवीन एटीव्हीएम मशिन्स बसवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.
सीव्हीएम कूपन्स हद्दपार करून एटीव्हीएमला प्रोत्साहन देण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयामागील व्यवहार्यता पडताळून पाहण्यासाठी विविध स्थानकांमधील एटीव्हीएम मशिन्सची पाहणी केली असता ही मशिन्स सुस्थितीत सुरू असल्याचे आढळले. डोंबिवली ते मुंबई छत्रपची शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यानच्या १२ प्रमुख स्थानकांवर पाहणी केली असता प्रत्येक स्थानकावर किमान ६० ते कमाल ७५ टक्के मशिन्स चालू होती. यात कळव्यातील सातपैकी सात, डोंबिवलीमध्ये १८ पैकी १५, भांडूपमध्ये ७ पैकी ६ या काही स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांपैकी सर्वाधिक एटीव्हीएम ठाणे स्थानकात आहेत. तसेच सर्वात जास्त बंद एटीव्हीएम मशिन्सही ठाण्यातच आहेत. ठाण्यात असलेल्या एकूण २३ एटीव्हीएमपैकी ९ मशिन्स बंद आहेत.
याबाबत मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांना विचारले असता, एटीव्हीएम प्रणाली ही वापरण्यास अत्यंत सोपी असल्याने रेल्वेही या प्रणालीला प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी सांगितले. तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे राहण्यात प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी एटीव्हीएम हा उत्तम पर्याय आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी आम्ही प्रत्येक स्थानकावर मशिन्सजवळ ‘फेलिसिटेटर’ किंवा मदतनीस उभे केले आहेत. हे आपल्या एटीव्हीएम कार्डवरून प्रवाशांना तिकीटे काढून देतात, असेही राणे यांनी सांगितले.
‘आता सीव्हीएम विसरा..’
मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेले सीव्हीएम कुपन हद्दपार करून एटीव्हीएम प्रणालीला प्रोत्साहन देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने तयारीही चालवली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर ७५ टक्के एटीव्हीएम मशिन्स उत्तम स्थितीत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-07-2013 at 08:23 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forget the cvm