मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढय़ातील समन्वयवादी नेते, माजी आमदार टी. एम. कांबळे (वय ५७) यांचे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
कांबळे दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. सन १९९० मध्ये राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेत काम केले. दलित पँथरचे मराठवाडय़ातील चळवळे कार्यकत्रे म्हणून त्यांची ओळख होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी संपूर्ण मराठवाडय़ात जाऊन त्यांनी नामांतर व्हायला हवे. मात्र, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. म्हणूनच ते समन्वयवादी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून कांबळे यांनी काम केले. मात्र, रिपाइंत फूट पडल्यानंतर त्यांनी स्वत:चा आरपीआय डेमॉक्रेटिक नावाने पक्ष काढला. या पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. गेले काही वष्रे ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. निधनाचे वृत्त कळताच सकाळपासूनच इंडियानगर येथील त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी दर्शन घेतले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा