शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते धनवटे नगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.
१९५२ ते १९९३ जवळपास ४१ वषार्ंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा रविवारी नंदनवनमधील महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महालातील धनवटे नगर विद्यालय म्हणजे पूर्वाश्रमीचे नीलसिटी हायस्कूल. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि शाळेचे माजी विद्यार्थी रवींद्र फडणवीस, नियंत पाठक आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हा माजी विद्याथ्यार्ंचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी नागपूरच्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी माजी विद्याथ्यार्ंचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्याथ्यार्ंनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि सध्या नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेले शाळेचे माजी विद्यार्थी नितीन गडकरी, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. चंद्रशेखर कप्तान, अ‍ॅथेलेटिक्स क्षेत्रात ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी घडविले असे भाऊ काणे, सांस्कृतिक क्षेत्रातील नाटय़ कलावंत संजय भाकरे, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे, अपूर्व मासोदकर, संगीत क्षेत्रातील व्हायोलिन वादक राजन भावे, तबलावादक राजू गुजर, गायक गुणवंत घटवाई, हर्षल भावे, अर्चनी जोशी, सचिन बक्षी, दिलीप चिचमालातपुरे, अ‍ॅड. भारद्वाज, रेखा मोघे, माधवी कोठेकर आदी विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा