जनसेवा समिती विलेपार्ले ही युवक संस्था  स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. शनिवार, रविवारी २६ व २७ जानेवारी रोजी  “दुर्गपती शिवराय” हे छत्रपति शिवरायांच्या गड कोट किल्ल्यांवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. संस्थेचा “दुर्गभ्रमंती” हा एक लोकप्रिय उपक्रम असून या भटकंती दरम्यान काढलेली सहयाद्रीतील गड कोट किल्ल्यांची विविध ऋतुतील आकर्षक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. महाराष्ट्रातील निवडक ४८ किल्ल्यांची १५० छायाचित्रे या प्रदर्शनात असणार आहेत. हे छायाचित्र प्रदर्शन प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुल,  शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व) येथे सकाळी १० ते रात्रौ ८.३० या दरम्यान  इतिहास आणि दुर्गप्रेमींसाठी निशुल्क खुले असणार आहे. छत्रपति शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात या किल्ल्यांचे अनमोल योगदान तसेच शिवरायांचे दुर्ग रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा अशा निवडक किल्ल्यांवर बांधणीतील कौशल्य आणि त्यांनी त्यात आणलेले दुर्गविज्ञान आदी गोष्टींचे महत्व विषद आधारलेले माहितीपट या प्रदर्शन दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी  सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत दाखविले जाणर आहे. पराग लिमये-९९८७५६५७३८ यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा