गेल्या दोन दिवसांत शहरातील चार बालक बेपत्ता झाले असून याप्रकरणी इमामवाडा व यशोधरा नगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध अपहरणाचे गुन्हा दाखल केले आहेत.
साहिल विजय राऊत (रा. इंदिरानगर) हा नऊ वर्षांचा मुलगा सोमवारी २२ सप्टेंबरला घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाला. भोला नरेश कराडे (रा. शाहू मोहल्ला) हा दहा वर्षांचा मुलगासोमवारी २२ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वंृदावननगर झोपडपट्टीत मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेला होता. त्याच्या शेजारी राहणारी कपाली लाखेकर ही अकरा वर्षांची मुलगी मंगळवारी २३ सप्टेंबरला सकाळी सहावाजेपासून बेपत्ता झाली. अजय संजय जोशी (रा. आनंदनगर) हा तेरा वर्षांचा मुलगा मंगळवारी २३ सप्टेंबरला चप्पल शिवून येतो, असे सांगून गेला.
या सर्वाचा त्याच्या पालकांनी शोध घेतला. ते सापडले नसल्याने त्यांच्या पालकांनी अनुक्रमे इमामवाडा व यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार केली. दोन दिवसात चार बालके बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली.
दोन दिवसांत शहरातील चार बालके बेपत्ता
गेल्या दोन दिवसांत शहरातील चार बालक बेपत्ता झाले असून याप्रकरणी इमामवाडा व यशोधरा नगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध अपहरणाचे गुन्हा दाखल केले आहेत.
First published on: 25-09-2014 at 01:25 IST
TOPICSहरवलेली मुलं
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four missing children in two days fron nagpur city