केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत चार मोरांचे मृतदेह आढळून आले.
मुदखेड शहरालगत केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात संरक्षण भिंतीलगतच्या शिवारात बेशुद्धावस्थेत सहा मोर आढळून आले. रामा मानसिंग राठोड, बालाजी गोवर्धन पवार व देविदास तेलंगे यांनी वन परिमंडळ एस. डी. चौधरी यांना या बाबत माहिती दिली. चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन सहाही मोरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहापैकी चार मोरांना मृत घोषित केले, तर दोन मोरांवर उपचार केले. मृत मोरांचे शवविच्छेदन केले असता त्यांच्या पोटात ज्वारी, तूर व चवळीचे दाणे आढळून आले. या चारही मोरांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Story img Loader