पोलीस ठाण्याची िभत फोडून मोक्का गुन्ह्य़ातील चार आरोपींनी पलायन केल्याच्या प्रकरणी डय़ूटीवरील चार पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्यावरून निलंबित करण्यात आले.
आष्टी पोलीस ठाण्याच्या शौचालयाची िभत फोडून मोक्का गुन्ह्य़ातील आरोपी पसार झाल्याचा प्रकार नुकताच घडला. यापकी तीन आरोपींना मंगरूळ शिवारात ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी पकडले. मात्र, त्यांचा म्होरक्या भीमा लक्ष्मण मस्के पसार झाला. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधव कारभारी यांनी तत्परतेने चौकशी केली. या घटनेच्या वेळी डय़ूटीवर असलेले पोलीस नाईक ईश्वर जर्मनसिंग वळवी, पोलीस शिपाई राकेश माणिक लोहार, अजय गोरख शिकेतोड व सुमीत संजय कारंजकर या ४ पोलिसांवर चौकशीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना ११ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा