घरासमोर असलेल्या चार मोटरसायकली पेटवून देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. सातारा गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली. जाळपोळीत संबंधितांचे सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले.
महेंद्र प्रकाश मनोहर (वय २५, सातारा) यांनी फिर्याद दिली. बुधवारी रात्री दहा ते गुरूवारी सकाळी सहाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दोन मोटरसायकली (पॅशन प्लस एमएच २० डीई ७३४२ व ग्लॅमर एमएच २० सीबी ८९८५), तसेच त्यांच्या शेजारी राहणारे बाळू मुरलीधर नणनवरे यांची लुना (एमवायजी ५३१५) व भागवत सुदाम मोरे यांची मोपेड (एमएच २० वाय ४२६२) अशा चार दुचाक्या जाळून टाकल्या. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली.
चार दुचाकी जाळल्या
घरासमोर असलेल्या चार मोटरसायकली पेटवून देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. सातारा गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली. जाळपोळीत संबंधितांचे सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले.
First published on: 22-11-2012 at 11:42 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four two wheeler burnout