संत सखूच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने येत्या १७ ते १९ डिसेंबर या तीन दिवसात चौथे अखिल भारतीय कीर्तन संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती चौफेरच्या सचिव शुभांगी हुद्दार यांनी दिली.
अखिल भारतीय कीर्तन कुल आणि येथील चौफेर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा, कोयनेच्या प्रीतिसंगमावर कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मराठी बरोबरच हिंदी, कानडी, संस्कृत, गुजराथी, पंजाबी भाषेतील सुमारे ६०० कीर्तनकार सहभागी होणार असून, पारंपरिक श्रवणीय कीर्तने ऐकण्याची दुर्मिळ संधी कराडकरांना लाभणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार चंद्रकांतदादा पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.      
संमेलनाच्या यशस्वीयतेसाठी कीर्तन कुल आणि चौफेरची संयुक्त सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात हभप आनंदबुवा जोशी, मोरेश्वरबुवा जोशी, चंद्रशेखर शुक्ल, न. चिं. अपामार्जने, समर्थसेवा मंडळाचे अध्यक्ष अरूण गोडबोले, चौफेरचे अध्यक्ष आनंद परांजपे, संचालक गोविंद कुलकर्णी, दीपक हुद्दार, ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांचा सहभाग आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा