एका महिला डॉक्टरची १५ लाख रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शहरातील दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. डॉ. पल्लवी विजयानंद बडोदेकर (३२), रा. ओंकारनगर, असे फसवणूक झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. सुशांत मेश्राम आणि डॉ. रजय भारशंकर अशी फसवणूक केलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. रामदासपेठेतील नीती गौरव कॉम्प्लेक्समध्ये डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत व्यवस्थापक पद मिळवून देतो असे सांगून आरोपींनी डॉ. बडोदेकर यांना कंपनीचे सदस्य बनण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी १५ लाख रुपये कंपनीत गुंतवले. ही रक्कम आरोपींनी स्वतच्या फायद्यासाठी वापरली. तसेच डॉ. बडोदेकर यांना व्यवस्थापक पदही मिळवून दिले नाही. हा प्रकार मे २०११ ते मार्च २०१४ या दरम्यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. बडोदेकर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
दोन डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
एका महिला डॉक्टरची १५ लाख रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शहरातील दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud case against two doctors