रुमालात पाचशे रुपयांच्या नोटेखाली वहीची कोरी पाने ठेवत ते दोन लाख रुपये असल्याचे भासवून भामटय़ांनी एकास ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. फसवणुकीचे प्रकार अव्याहतपणे सुरू असून दुसऱ्या घटनेत टाकळी रस्त्यावर पोलीस असल्याचे भासवून एका महिलेकडून सोन्याच्या बांगडय़ा लंपास करण्याचा प्रकार घडला. बनावट दस्तावेजाद्वारे पिंपळगाव बहुला शिवारातील भूखंडाची चार संशयितांनी विक्री करत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमृतधाम परिसरात वास्तव्यास असलेले विजय गावंडे यांना सोमवारी दुपारी नेहरू उद्यानासमोरील इलाहाबाद बँकेत दोन संशयितांनी गाठले. त्यांच्याकडे ७० हजार रुपयांची रोकड होती. त्यात १०००, ५०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. या वेळी संशयितांनी त्यांना आपल्याकडे ५०० रुपयांच्या नोटांचे दोन लाखांचे बंडल असल्याचे सांगून गावंडे यांच्याकडील ७० हजार रुपये घेतले. या वेळी संशयितांनी त्यांच्याकडील रुमालात बांधलेली रक्कम गावंडे यांना स्वाधीन केली. दरम्यानच्या काळात संशयित निघून गेले. रुमालातील रोकड पाहताना त्यात ५०० रुपयांची केवळ एकच नोट आणि त्याखाली वहीची कोरी पाने ठेवल्याचे निदर्शनास आले. या घटनेत आपली ७० हजार रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार गावंडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली.
अशी ही ‘बनवाबनवी’
रुमालात पाचशे रुपयांच्या नोटेखाली वहीची कोरी पाने ठेवत ते दोन लाख रुपये असल्याचे भासवून भामटय़ांनी एकास ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2014 at 10:50 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in bundle of notes