जिल्हा पोलीस दलाच्या भरतीच्या ‘तोतयागिरी’ प्रकरणातील आणखी एक आरोपी न्यायालयात हजर झाला. किरण खुशालसिंग कवाळे (औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे, त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन आरोपी चरणसिंग जोनवाल व कल्याण जोनवाल (दोघेही रा. औरंगाबाद) या दोघांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
मागील महिन्यात पोलीस भरती झाली. त्यामध्ये मूळ उमेदवारांऐवजी डमी उमेदवारांनी लेखी व मैदानी परीक्षा दिल्याचे एका निनावी पत्राद्वारे उघड झाले. यासंदर्भात प्रभारी उपाधीक्षक सुरेश गायधनी यांच्या फिर्यादीनुसार उमेदवार व डमी अशा एकूण सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील अर्जुन धुनावत, सज्जन लोखंडे, गोपाल ब्रम्हनावत व राम बुधासिंग या चौघांना पूर्वीच अटक करण्यात आली होती, त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.
किरण कवाळे याने पर्वीच अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. परंतु तो आज न्यायालयापुढे हजर झाला. तो भरतीत डमी म्हणून सहभागी झाला होता. त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2013 रोजी प्रकाशित
आणखी एक ‘डमी’ न्यायालयात हजर
जिल्हा पोलीस दलाच्या भरतीच्या ‘तोतयागिरी’ प्रकरणातील आणखी एक आरोपी न्यायालयात हजर झाला. किरण खुशालसिंग कवाळे (औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे, त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

First published on: 28-06-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in police recruitment one dummy attend in court