विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली कांदिवली येथील एका व्यक्तीची दोन लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी नेरूळ येथील हावरे सेंच्युरियन मॉलमध्ये नार्थ अमेरिकन सव्‍‌र्हिस सेंटर या नावाने कार्यालय थाटले होते.
चारकोप येथे राहणारे रइस जहिर शेख यांना एप्रिल महिन्यात आरोपीने कॉल करून त्यांच्या मुलीला फिलापाइन या देशातील युनिव्हसिर्टी पेरी पेटिअल हेल्थ सिस्टमध्ये प्रवेश मिळवून देतो अशी धाप मारली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून शेख यांनी प्रवेश प्रकियेसाठी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. यानंतर त्यांना आरोपीने प्रवेश निश्चितीचे पत्र दिले होते. मात्र हे पत्र बनावट असल्याचे समोर आल्याने शेख यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेख यांच्या तक्रारीनुसार सेंटरमधील र्कीती वासन, सुब्रमण्यम, व्ही. व्यंकेट, स्नेहा तांबे आणि शीतल या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.