मुलीचा दृष्टिदोष दूर करण्यासाठी आयुर्वेदिक औषध देतो, असे सांगून थोडीथोडकी नाही तर तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला ठकसेनांनी गंडा घातला ती व्यक्ती चांगली उच्चशिक्षित आणि उच्च पदावर काम करणारी आहे. आपली उघडउघड फसवणूक होत असल्याचे या व्यक्तीच्या लक्षातच आले नाही. आणि झालेली फसवणूक लक्षात आली त्यावेळी उशीर झाला होता. मात्र, पोलिसांनी शिताफीने या उच्चशिक्षिताला फसवणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे.
ग्यानेंद्र शर्मा (३९) हे वांद्रे कुर्ला संकुलातील महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. २६ जुलै रोजी ते पत्नी आणि मुलांसह नवी मुंबईच्या एका शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. त्यांच्या चार वर्षांच्या मुलीला इनिकाला चष्मा होता. मॉलमध्ये बिलाच्या रांगेत उभे असताना शर्मा यांच्याकडे एक जण आला त्याने शर्मा यांच्याशी ओळख करून घेत आपले नाव राम शिंदे असल्याचे सांगितले. मुलीच्या चष्म्यावरून विषय निघाला. दृष्टिदोष असल्याने मुलीला चष्मा लागल्याचे ग्यानेंद्र यांनी शिंदेला सांगितले. त्यावर शिंदे याने आपल्या परिचयातील एक आयुर्वेदिक दुकान असल्याचे सांगत तेथून औषध घेण्याचा सल्ला ग्यानेंद्र यांना दिला. आपला भाऊ तुमच्या घरी येईल असे सांगत शिंदेने शर्माचा पत्ता मागून घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशी झाली फसवणूक
दुसऱ्या दिवशी अशोक शिंदे नाव सांगणारा एक इसम शर्मा यांच्या घरी गेला. राम शिंदेचा भाऊ अशी त्याने ओळख करून दिली. त्याने सोबत एक औषधाची बाटली आणली होती. या बाटलीत आणखी काही आयुर्वेदिक औषधं मिसळावी लागतील व त्यासाठी पाच-सहा हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. त्याच्या बोलण्याला फसलेले शर्मा सात हजार रुपये घेऊन त्याच्यासोबत निघाले. अशोक त्यांना ठाण्यातील जांभळी नाका येथे घेऊन गेला. तेथे असलेल्या तिघांनी शर्मा यांच्यासमोर त्या बाटलीत काही औषधं आणि तेल मिसळले. त्यांनतर त्यांनी शर्माना बिलाचा आकडा सांगितला तोही तब्बल सहा लाख ७७ हजार ६०० रुपये! शर्मा यांनी त्यांच्याकडील सात हजार रुपये दिले. पण त्यांनी बाकीची रक्कम द्यावीच लागेल असा दबाव टाकला. मग शर्मा त्यांच्या बोलण्यात फसले. त्यांनी दोन एटीएममधून आरोपींना ७८ हजार रुपये रोख दिले. तसेच क्रेडीट कार्डद्वारे चिंतामणी ज्वेलर्स मध्ये जाऊन २ लाख २२ हजार रुपयांचे सोने खरेदी करून दिले. तरी रक्कम पूर्ण होत नसल्याने २ लाख ७० हजार रुपये रकमेचे धनादेश दिले. त्यानंतर औषधाची बाटली घेऊन घरी आले. घरी आल्यावर मात्र आपली फसवणूक झाली आणि आपण जवळपास सात लाख रुपयांना गंडवले गेलो, हे त्यांच्या लक्षात आले.

आरसीएफ पोलिसांची तत्परता
 दुसऱ्या दिवशी शर्मा यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत, पोलीस निरीक्षक शांतीलाल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे आदींच्या पथकाने तपास करून व्यंकटेश नायडू (३६), श्रीराम गुडील (३१) आणि अनिल शिर्के (२१) या तीन आरोपींना अटक केली. त्यांनी याप्रकारे अन्य कुणाला फसवले आहे का त्याचा तपास सुरू आहे.