व्हॉट्सअॅपला पर्याय देणारी भारतीय संदेशवहन अॅप कंपनी ‘हाइक’ने आता मोफत फोन कॉल सुविधाही सुरू केली आहे. ही सुविधा सुरुवातीला केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सुरू होणार असून मार्च २०१५पर्यंत आयओएस आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
हाइकने २०१२मध्ये जागतिक बाजारपेठेत उडी घेतली आणि त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या अल्पावधीत कोटय़वधी झाली. संदेशवहन अॅपमधील सुविधांमुळे काही काळाने व्हॉट्सअॅपलाही आपल्या सुविधांमध्ये बदल करावा लागला होता. या कंपनीने नुकतीच ‘झिप फोन’ ही मोफत कॉलिंग अॅप कंपनी विकत घेतली.
या कंपनीने विकसित केलेल्या सुविधांमध्ये काही बदल करून हाइकने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता मोफत कॉलिंग अॅपमध्येही मोठी स्पर्धा होणार असून व्हॉट्सअॅपही लवकरच या स्पध्रेत उतरणार असल्याची चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in