राज्य सरकारच्या विमुक्त भटक्या जमातीतील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे ४५ घरे साकारणार असून, राज्यात सर्वप्रथम या योजनेचा मान लातूरला मिळाला.
सिकंदरपूर येथे सुमारे ३५ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आलेली ४५ भटके कुटुंबे सुमारे १ एकर जागेत पाली घालून राहात होते. तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत या लोकांना पक्की घरे मिळावीत, यासाठी सरपंच माधव गंभीरे, तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही पाठपुरावा केला होता. समाजकल्याण विभागाकडे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यातून पक्क्या घरांसाठी तब्बल १ कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर झाला. २७५ नागरिकांची वस्ती असलेल्या व गवताच्या पालीमध्ये राहणाऱ्या ४५ कुटुंबांना प्रत्येकी २६९ चौरस फुटाची पक्की घरे बांधून मिळणार आहेत. सोबत सेफ्टी टँक, गटारी, पाणी, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, शाळा व सभागृहही या योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तांडय़ावरील लोकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा