महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अलीकडेच राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्याची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. उमेदवारांना अभ्यासक्रमाची माहिती व्हावी म्हणून नाथे करिअर अकादमीचे संचालक प्रा. संजय नाथे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाची कार्यशाळा रविवार, २५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. नाथे करिअर अकादमी, मेडिकल चौक, नागपूर येथे नि:शुल्क आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी उमेदवारांनी नाथे करिअर अकादमीच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Story img Loader