ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-मुरबाड परिसरात सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक भाई कोतवाल यांचे अंबरनाथ येथील सहकारी दिवंगत धोंडू देसाई यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यांची मुलगी संध्या सतीश महाजन यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
अंबरनाथमधील धोंडू देसाई वसाहतीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका समारंभात या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी शिवाजीनगरमधून जाणाऱ्या रस्त्याला धोंडू देसाई यांचे नाव देण्याची मागणी वसाहतीचे संस्थापक अध्यक्ष किसन तारमाळे यांनी केली.
धोंडू देसाई यांची नात सिद्धी महाजन यांनी आजोबांची थोडक्यात महती सांगितली. प्रकाशिका रुपाली सुनील जावडेकर, महेश तपासे, पत्रकार अजित म्हात्रे, अनंत बोंडकर, अनिल काळे, नंदिनी देसाई, प्रवीण देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर जाधव यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा