दिवाळी अंक भेट योजना सुरू करण्याचा प्रघात मॅजेस्टिक बुक हाऊसच्या यंदाच्या दिवाळी अंक भेट योजनेत अक्षर, ऋतुरंग, श्रीदीपलक्ष्मी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळ आणि उत्तम अनुवाद असे सात दर्जेदार दिवाळी अंक देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘माझी जन्मठेप’, ‘काळे पाणी’, ‘सहा सोनेरी पाने’ ही तीन गाजलेली पुस्तके देण्यात येणार आहेत. संपूर्ण संचाची मूळ किंमत एक हजार रुपये असून या संचाच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी मॅजेस्टिक बुक हाऊस, विष्णू निवास, टिळक पुलाखाली, दादर पश्चिम येथे अथवा २४३०५९१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याशिवाय डोंबिवली पूर्व (२८०११०१), विलेपार्ले पूर्व (२६१३२८७९) या क्रमांकांवरही संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Story img Loader