शत्रूला भेटण्यास गेल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणास मारहाण करून चाकूने हल्ला केला. नंदनवन झोपडपट्टीत दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संजय उर्फ मोनू दुर्गासिंह ठाकूर (रा. नंदनवन झोपडपट्टी) हा काही दिवासांपूर्वी एका मित्रास भेटण्यास गेला होता. तो एका खुनाच्या गुन्ह्य़ात आरोपी आहे. हे समजल्यानंतर विलास बाबुराव बोरगे. रवि रमेश माचेवार, सचिन पडगिलवार, व विजय गणवीन (सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी) यांनी मोनूला गाठले. त्याला  दुचाकीवर बसवून काही अंतरावर नेले. ‘अपने दुश्मन को मिलने जाता है’ म्हणत विलासने त्याला अश्लील शिवागाळ केली व चाकुने डाव्या पायाच्या मांडीवर वार केले. रवी व सचिन या दोघांनी त्याला दंडय़ाने मारहाण केली. मोनूला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून विलास बाबुराव बोरगे व रवि रमेश माचेवार या दोघांना अटक केली.
घर पेटविले
पाहुण्याने दारूच्या नशेत घर पेटवून दिल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दक्षिण नागपुरातील रतननगरात घडली. शोभा लालबहादूर विश्वकर्मा या त्यांच्या सोळा वर्षांच्या मुलीसह घरी होत्या. आरोपी नरेश भीमराव मेश्राम त्यांच्या घरी जेवण करीत होता. त्याने दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ व मुलीला मारहाण केली. तिला घेऊन शोभा मेडिकल रुग्णालयात गेली. तेवढय़ा वेळेत आरोपी नरेशने घराला आग लावली. त्यात घरातील सामान जळाले. अजनी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला.

Story img Loader