बाळाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध आजार व इतर बाबींवर चाईल्ड हॉस्पिटल, फिजीशियन्स फॉर पीस व दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायंसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च दरम्यान राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे संयोजक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘ग्रंथापासून रुग्णापर्यंत’ अशी कार्यशाळेची संकल्पना आहे. बालरोग शास्त्राच्या विविध आधुनिक व अत्याधुनिक जीवनपयोगी पुस्तकी ज्ञानाचा उपयोग थेट रुग्णापर्यंत पोहचविण्यासाठी काय करणे शक्य आहे त्यावर विचार मंथन होणार आहे. कार्यशाळेत डॉ. स्टेनटन, डॉ. एडवर्ड कॅरोटकीन, डॉ.झिमरमॅन, डॉ. रॉबर्ट डिब्बालासी, डॉ. ख्रिस्तोफोर फोले आदी विदेशी तज्ज्ञ कार्यशाळेला उपस्थित राहणार आहे. दिल्लीच्या नीलम मोहन, डॉ. सुजाता सहानी, मुंबईच्या डॉ. नलिनी शहा, डॉ. देशपांडे आदी तज्ज्ञ मागदर्शन करणार आहे. ‘अ‍ॅनाटॉमी, डिनोटिक्स व मेटॅबोलिक डिसऑर्डर’ वर कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत देशभरातून ५०० तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग राहील. उत्कृष्ट क्रिटीकल केअर देण्याचा प्रयत्न कार्यशाळेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जनावरांमध्ये दोन तृतीयांश किटाणू असतात, जनावरांच्या संपर्कात आल्याने किंबहुना संसर्गामुळे माणसाला विविध आजार होतात व ते दिवसेंदिवस वाढतात. होणारे आजार अत्यंत दुर्मिळ असतात. जनावरांपासून होणारे आजार हा संशोधनाचा विषय आहे. पण या आजाराविषयी वैद्यकीय क्षेत्राला अद्यापही फारशी माहिती नाही. या आजारावर कार्यशाळेत मंथन होणार असल्याचे डॉ. देवपुजारी यांनी सांगितले. नवनवीन डॉक्टरांसह  नवीन डॉक्टरांचीही संख्या वाढत आहे. वैद्यकीय शिक्षणात रुग्णांशी कसे बोलावे या बाबत डॉक्टरांना ज्ञान दिले जात नाही. रुग्ण व नातेवाईकासोबतच्या संवादाअभावी नातेवाईक संतप्त होऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहे. डॉक्टर व रुग्णांमधील प्रसार माध्यम हा दुवा आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी यााठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. देवपुजारी यांनी व्यक्त केली.