महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य संघटक प्रतिनिधी, जिल्हा संघटक व तालुका संघटक प्रतिनिधी तसेच अनेक कार्यकत्रे उपस्थित होते.
सदर मोर्चा गांधी मदान, राजवाडा येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे त्याचे सभेत रूपांतर होऊन जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांना निवेदन देण्यात आले.
देशातील १८६ उद्योगातील प्रा. फंड पेन्शनरांना दरमहा ६५०० रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा, मुंबईतील गिरणी कामगारांना मुंबईत गिरण्यांच्या जागी विनामूल्य घरे ताबडतोब द्यावीत, आदर्श इमारत घोटाळ्यात जे मंत्री, अधिकारी व भाजपाचे काही नेते अडकले आहेत, त्या सर्वावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, गरीब जनतेला गॅस सििलडरचे १,३३१ रुपये किंमत देणे शक्य नाही, तरी सबसीडी सोडून ग्राहकांकडून सििलडरचे पसे घ्यावेत, अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे केसरी कार्ड धारकासह सर्व वंचित घटकांना रेशनच्या धान्याचा लाभ मिळावा, अंगणवाडी कर्मचारी, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना आरोग्य सुविधा व पेन्शन तसेच किमान वेतन लागू करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर कॉ. विजय निकम, कॉ. शंकर पाटील, आयु. चंद्रकांत खंडाईत, कॉ. शिवाजी गोरे यांची स्वाक्षरी आहे.

Story img Loader