गॅस एजन्सीत चाळीस लाखांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी एका लेखापालाविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  अतुल पी. मानवटकर (रा. जरीपटका) हे आरोपीचे नाव असून तो मोहम्मद रफी चौकातील अबोल गॅस अँड डोमॅस्टिक अप्लायन्सेसमध्ये लेखापाल होता. गेल्या आठ वर्षांपासून बिल बुक व लेखा पुस्तकात खोटय़ा नोंदी करून त्याने सिलेंडर विक्रीतून आलेल्या रकमेतून ४० लाख ४६ हजार २३२ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार एजंसी मालकाने पाचपावली पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बेरोजगाराची ८ लाखाने फसवणूक
फसवणुकीची दुसरी घटना गिट्टीखदानमध्ये घडली. रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगाराची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. पिजुष कृपाल घोष (रा. पंजाबी लाईन रेल्वे वसाहत) हे आरोपीचे नाव आहे. जयहिंद नगरात राहणाऱ्या एका तरुणीला रेल्वेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पिजुषने ओमप्रकाश नावाच्या साथीदारासह ८ लाख २ हजार ५०० रुपये रोख व धनादेशाद्वारे घेतले. त्याने नोकरी लावून न दिल्याने त्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पिजुषला अटक केली.  

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

कुत्रा आडवा आल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू
कुत्रा आडवा आल्याने एका मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. आनंद श्याम चोखांदे (रा. बोरगाव) हा त्याच्या मोटारसायकलने गिट्टीखदानकडे येत होता. अचानक मोटारसायकलपुढे कुत्रा आडवा आल्याने आनंदचे नियंत्रण सुटले नि मोटारसायकल रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सदोष मनुष्यवध
एका सायकलस्वाराचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी अनोळखी दोन मोटारसायकल चालकांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेमदास बाळाजी धुर्वे (रा. राऊत नगर) हा सायकलने ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील टेलिफोन नगर चौकातून जात होता. तेथून जात असलेल्या अनोळखी दोन मोटारसायकल चालकांचा धक्का लागल्याने प्रेमदास खाली पडला. त्याने मोटारसायकल चालकांना शिवीगाळ केली. त्यातून भांडण झाले आणि त्या दोघांनी प्रेमदासला मारहाण केली. जखमी प्रेमदासचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात घटनाक्रम उघड झाल्याने अनोळखी दोन मोटारसायकल चालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विनयभंग
शासकीय काम करीत असताना विनयभंग केल्याच्या एका महिला हवालदाराच्या तक्रारीवरून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील स्टेनो आरोपी विलास डोमाजी कोहचाडे (रा. गोधनी) याच्या विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

शासकीय काम करीत असताना विनयभंग केल्याच्या एका महिला हवालदाराच्या तक्रारीवरून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील स्टेनो आरोपी विलास डोमाजी कोहचाडे
(रा. गोधनी) याच्या विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader