गॅस एजन्सीत चाळीस लाखांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी एका लेखापालाविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अतुल पी. मानवटकर (रा. जरीपटका) हे आरोपीचे नाव असून तो मोहम्मद रफी चौकातील अबोल गॅस अँड डोमॅस्टिक अप्लायन्सेसमध्ये लेखापाल होता. गेल्या आठ वर्षांपासून बिल बुक व लेखा पुस्तकात खोटय़ा नोंदी करून त्याने सिलेंडर विक्रीतून आलेल्या रकमेतून ४० लाख ४६ हजार २३२ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार एजंसी मालकाने पाचपावली पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा