हिंदू धर्म, संस्कृतीचे जतन, सर्वधर्मसमभावाची जोपासना, तसेच स्वागत यात्रेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्याचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा या उद्देशातून कल्याणमध्ये संस्कृती मंचच्या माध्यमातून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. मंचकडे उत्पन्नाचा स्रोत नसल्याने निधी मिळण्यासाठी दरवर्षी एका संस्थेकडे यात्रेच्या संयोजनाची जबाबदारी देण्यात येते, अशी माहिती संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुरेश एकलहरे व डॉ. वसंत काणे यांनी एका पत्राद्वारे दिली.
यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी निधी जमा होतो, पण हा निधी खर्च होत असल्याने संचित निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शहरातील उत्सवप्रेमी संस्थेकडे यात्रेची जबाबदारी सोपवून त्यांच्याकडून काही निधी सामाजिक कार्यासाठी धनादेशाद्वारे घेतला जातो. अनेक संस्थांनी या कार्याला सहकार्य केले आहे.
संस्थेला व्यवस्थापन देणे म्हणजे ठेकेदारी नसून त्या माध्यमातून निधी संकलन करणे हा आहे, असे एकलहरे, काणे यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
स्वागत यात्रा निधीचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी
हिंदू धर्म, संस्कृतीचे जतन, सर्वधर्मसमभावाची जोपासना, तसेच स्वागत यात्रेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्याचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा या उद्देशातून कल्याणमध्ये संस्कृती मंचच्या माध्यमातून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते.
First published on: 29-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund from rally using for social purpose