अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यानी सांगितले.
शासकीय विश्रामगृहात मदत, पुनर्वसन व वने विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बठक पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, अप्पर विभागीय आयुक्त गोकुळ मवारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, मुख्य वन संरक्षक मेईपोकीम अय्यर, पुनर्वसन उपायुक्त डॉ. धजराज केंद्रे, यांची उपस्थिती होती.
मराठवाडा विभागातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, टंचाईस्थिती, वृक्षलागवड ,पुनर्वसन आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. नांदेड व िहगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीच्या मदतीसाठी लागणारा निधी तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे कदम म्हणाले. विभागातील काही जिल्हय़ात कमी पावसामुळे १३० टँकर चालू असल्याची माहिती आहे. तेथे आवश्यकतेनुसार टँकर चालू ठेवण्याची सूचना पतंगराव कदम यांनी केली. बाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना करताना कदम म्हणाले की, पुनर्वसित गावांना सुविधा पुरविण्यासाठी लागणारा निधी तातडीने पुरविण्यात येईल. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जमीन उपलब्ध नसेल तेथे त्वरित जमीन उपलब्ध करून घेण्याची सूचना करण्यात आली. मराठवाडय़ातील शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ७५ लाख रोपांची लागवड झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत, पुनर्वसन व वने विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बठक पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी घेण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-09-2013 at 01:54 IST
TOPICSऔरंगाबाद (Aurangabad)Aurangabadकापणीजोरदार पाऊसHeavy Rainदुष्काळ (Drought)Droughtपतंगराव कदमफंडFundलॉस
+ 3 More
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund offer for heavy rain loss patangrao kadam