संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०११-१२ अंतर्गत जिल्हास्तरावरील पारितोषिकाचे वितरण सरपंच, ग्रामसेवकांना कामगार मंत्री व बुलढाणा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री, तसेच खासदार, आमदारांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीत करण्यात आले.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, हरीभाऊ जावळे, अध्यक्ष वर्षां वनारे, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, आमदार राजेंद्र शिंगणे, दिलीपकुमार सानंदा, संजय कुटे, चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, विजयराज शिंदे, संजय रायमुलकर, महिला व बालकल्याण सभापती सायली सावजी, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आले.
यावेळी सिंदखेडराजा ग्रामपंचायत महारखेड येथील सरपंच इंदू नागरे, ग्रामसेवक गणेश जायभाये यांना ५ लाखाचा प्रथम पुरस्कार, बुलढाणा ग्रामपंचायत पळसखेड नागो येथील सरपंच भूपेश जाधव, ग्रामसेवक एन.डी.जाधव यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३ लाख रुपये, खामगाव ग्रामपंचायत राहूडचे सरपंच कामिनी मनस्कार, ग्रामसेवक सतीश देवचे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये ३ लाख, खामगाव-गारडगाव येथील मुख्याध्यापक प्राथमिक शाळा प्रथम क्रमांक ५० हजार रुपये व खामगाव राहूड अंगणवाडी सेविका माया देशमुख, गटविकास अधिकारी प्रकाश वाघ, विस्तार अधिकारी एन.डी. सुलताने यांना २५ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तर कार्यक्रमाचे संचलन चंद्रशेखर जोशी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा