मराठी व जागतिक रंगभूमीचे व्यासंगी, वृत्तपत्र लेखक आणि नाटय़ समीक्षक गजानन तांडेल यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी सिंधू तांडेल या स्वातंत्र्य सैनिक होत्या. तांडेल यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अभिनयाचार्य शकरराव पाटकर, नाटक-प्रवाहांचे उगम आणि रंगधर्म ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून पाच दशके मराठी रंगभूमी आणि संगीत यातील घडामोडींवर आधारित स्फूटलेखन, पत्रलेखन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in